नवी दिल्ली : देशातील कनिष्ठ न्यायालयांप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत तब्बल ७१ हजारांहून अधिक खटले सर्वोच्च न्यायालयात रेंगाळली आहेत. तर १० हजारांहून अधिक खटले मागील दहा वर्षांपासून रेंगाळलेले आहेत. ही माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू दिली. दरम्यान, देशातील वाढती लोकसंख्या, परिणामी वाढेत गुन्हे याबाबत अनेक न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केल्याची उदाहरणे आहेत. कित्येक गुन्हे, खटले न्यायालयात कित्येक वर्षापासून बाकी आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा