बर्मिंगहॅम : स्क्वाशमध्ये भारताच्या सौरभ घोसालने इतिहास रचला. त्याने भारताला राष्ट्रकुलमधील पहिले वहिले पदक जिंकून दिले. सौरभ घोसालने इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपचा 3 – 0 असा पराभव केला. भारताला स्क्वाशमध्ये यापूर्वी एकेरीत एकदाही पदक मिळाले नव्हते. मात्र सौरभने भारताला स्क्वाशमधील पहिले पदक जिंकून दिले. त्याने कांस्य पदकाला गवसणी घातली.

सौरभने जेम्स विरूद्धचा पहिला गेम 11-6 असा सहज जिंकला. त्यानंतर दुसर्‍या गेममध्येही सौरभने आपला दबदबा कायम राखत गेम 11-1 अशा मोठ्या फरकाने जिंकत 2 – 0 अशी आघाडी घेतली. मॅच गेममध्ये त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत गेम 11-4 असा जिंकला. याचबरोबर त्याने भारताच्या पहिल्या पदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे जेम्स हा कधी काळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. सौरभने त्याचाच दारूण पराभव करत इतिहास रचला.

दरम्यान, सौरभ घोसालने स्क्वाशमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ’सौरभ घोसालला यशाची नवी शिखरे पार करताना पाहून आनंद झाला. त्याने बर्मिंगहममध्ये जिंकलेले कांस्य पदक खास आहे. या पदकासाठी त्याचे अभिनंदन. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय तरूणांमध्ये स्क्वाश खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा