रेपो दरात अर्धा टक्के वाढ

मुंबई : रिझर्व बँकेने शुक्रवारी बँकांना देण्यात येणार्‍या कर्जावरील व्याज दरात (रेपो) अर्धा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे वाहन आणि गृहकर्ज व्याज वाढणार आहे. पर्यायाने वाहन आणि गृह कर्जाच्या मासिक व्याजाच्या हप्त्यातही आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. .

रिझर्व बँकेने रेपोमध्ये अर्धा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बँकांना रिझर्व बँकेकडून घेतलेल्या कर्जावर आता 5.40 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे व्याज दरातील तफावत भरून टाकण्यासाठी बँकांना ग्राहकांना देण्यात येणार्‍या व्याजाच्या दरात वाढ करावी लागणार आहे. दुसरीकडे वाढत्या महागाईवर अंकूश ठेवण्यसाठी व्याजदरात वाढ केल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. कोरोना काळात व्याजदरात पाव टक्के वाढ केली होती. त्यामुळे व्याज दर हा कोरोना काळापूर्वी जेवढा होता. तेवढा आता झाला आहे. देशात वाढत असलेल्या महागाईवर अंकूश आणण्यासाठी रेपोत वाढ केल्याचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितले. महागाईचा दर गेल्या सहा महिन्यांत ६ टक्क्यांवर आहे. त्याची आणखी वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक बाजारपेठेतील महागाईचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे सांगताना दास म्हणाले, रेपोमध्ये वाढ केल्यामुळे मागणी कमी होईल आणि पर्यायाने महागाईवर अंकूश आणता येणे शक्य होईल, असा होरा बँकेचा आहे. त्यादृष्टीने रेपोत वाढ केल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा