हंगाम सुरू; ग्राहकांकडून मागणी
पुणे : आरोग्य वर्धक पळ म्हणून ड्रॅगन फळाची ओळख आहे. विशेष म्हणजे या फळाचा आकार आणि रंग आकर्षक असल्याने आपोअपच ग्राहकांचे पाय या फळाकडे आकर्षित होत असतात. ग्राहकही या फळाची वाट पहात असतात. बाजारात ड्रॅगन फळाची आवक नुकतीच सुरू झाली आहे. मागणी चांगली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दरात 10 टक्के वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या या फळाचा दर्जा चांगला असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
सुपेकर म्हणाले, मार्केटयार्डातील फळ विभागात नगर, सोलापूर आणि सातारा भागातून ड्रॅगन फळांची रोज 5 ते 10 टनाची आवक होत आहे. लाल रंगाच्या या फळाला 30 ते 150 रूपये दर मिळत आहे, तर पांढर्‍या रंगाच्या फळाला 30 ते 10 रूपये दर मिळत आहे. येत्या पंधरा दिवसांत ड्रॅगची आवक आणखी वाढणार आहे. शरिरातील पेशी वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरते. त्यामुळेच या फळाला मागणक्ष चांगली असते असेही सुपेकर यांनी नमूद केले.
बाजारात दाखल होत असलेले फळ 100 ते 600 ग्रॅमचे आहे. या फळाचा हंगाम जून ते नोव्हेंबरपर्यंत असतो. नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने दरही अधिक आहेत. आवक वाढल्यानंतर दरात घट होऊ शकते. पुणे विभागात मागील दोन वर्षांत ड्रॅगन फळाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या फळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. सुमारे 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत हे फळ येते. तसेच झाडाच्या आकारानुसार फळे येतात. मोठे झाड असेल, तर एका झाडाला 5 ते 6 किलो माल निघतो. नगर आणि सोलापूर परिसरातील फळाला चांगली चव असल्याचेही पांडूरंग सुपेकर यांनी सांगितले.
गुजरात ड्रॅगनचीही आवक
बाजारात पुणे विभागासह गुजरात येथूनही ड्रॅगन फळाची आवक होत आहे. गुजरातचे फळ आपल्यापेक्षा आकाराने मोठे असते. मात्र चवीला आपल्या फळापेक्षा थोडे संपक असते. तसेच गुजरात येथील फळ 2 ते 3 दिवस टिकत असते. तर पुणे विभागातील फळ 5 ते 6 दिवस टिकत असते. विशेष म्हणजे पुणे विभागात तयार झालेले फळ चवदार आहे. त्यामुळे पुणे विभागातील ड्रॅगन फळाला ग्राहक प्राधान्य देतात. असेही पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा