पुणे : महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात शहर काँग्रेसतर्फे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकांत शुक्रवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले.
प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढविले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील 45 वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मागील आठ वर्षांत नोकर्‍यांसाठी 22 कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ 7 लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, अनिल सोंडकर, ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रदिप परदेशी, शोएब इनामदार, प्रविण करपे, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, उस्मान तांबोळी, बाळासाहेब दाभेकर, रमेश अय्यर, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सुजित यादव, नरेंद्र व्यवहारे, उमेश कंधारे, अविनाश गोतारणे, अनिल अहिर, रवि मोहिते, भरत सुराणा, परवेत तांबोळी, अनुसया गायकवाड, नंदा ढावरे, वैशाली रेड्डी, बेबी नाज, योगिता सुराना, रजिया बल्लार, स्वाती शिंदे, ताई कसबे, शानी नौशाद, राधिका मखामले, नलिनी दोरगे, सीमा महाडिक, अनिता धिमधिमे, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, नरसिंह आंदोली, दिपक ओव्हाळ, वाल्मिक जगताप, भगवान कडू, विश्वास दिघे, भरत सुराणा, स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा