नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे 12 खासदार आज (शुक्रवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. ही औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली 12 खासदार राष्ट्रपतींची भेट घेतील. उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या (शनिवारी) मतदान होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा