इस्लामाबाद : मुंबईहून २० वर्षांपूर्वी दुबईला गेलेली ५० वर्षीय महिला पाकिस्तानात सापडली आहे. बेपत्ता महिला हमीदा बानोचा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. पाकिस्तानच्या यूट्यूबर्समुळे ती तिच्या कुटुंबाला भेटली आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलली. हमीदा बानोचे कुटुंबीय आता तिला पाकिस्तानातून भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हमीदाकडे ना पैसे आहेत ना तिचा पासपोर्ट.

पाकिस्तानी यूट्यूबर मारूफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हमीदा बानोचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याने सांगितले की, ही महिला सध्या पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये राहते आणि तिच्या कुटुंबापासून विभक्त झाली आहे. त्यांचे कुटुंब मुंबईतील कुर्ला येथे राहते. व्हिडिओमध्ये बानोने सांगितले की, 20 वर्षांपूर्वी ती दुबईला गेली होती आणि तिथून तिची पाकिस्तानात तस्करी झाली.

कुर्ल्याच्या कसाईवाडा परिसरात राहणार्‍या बानो यांची मुलगी यास्मिन बशीर शेख हिला सोशल मीडियावर प्रचार सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने कळले. यास्मिन म्हणाली की, 2002 साली माझी आई कामानिमित्त एजंटमार्फत दुबईला गेली होती, तेव्हापासून तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. आमची आई जिवंत आहे याचा आम्हाला आनंद आहे. आता त्यांना परत आणण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी आमची इच्छा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा