नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला गेल्या 5 वर्षात सुमारे 1.29 कोटी मते मिळाली आहेत. निवडणूक अधिकार संस्था एडीआरने ही माहिती दिली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी 2018-2022 दरम्यान झालेल्या निवडणुकांच्या आधारे ही माहिती मिळवली.

अहवालानुसार, विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला सुमारे 64 लाख 53 हजार 652 मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील गोपालगंज मतदारसंघात ‘नोटा’ला सर्वाधिक 51,660 मते मिळाली, तर लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी 100 मते मिळाली.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला दोन राज्यांमध्ये 7 लाख 49 हजार 360 मते मिळाली होती. त्यापैकी 7 लाख 06 हजार 252 मते बिहारमध्ये आणि 43 हजार 108 मते दिल्लीत मिळाली. 2022 मध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला सर्वात कमी 8 लाख 15 हजार 430 मते मिळाली होती.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, ‘नोटा’ला सर्वाधिक 7,42,134 मते मिळाली आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मिझोरामला सर्वात कमी 2,917 मते मिळाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा