बर्मिंगहॅम :भारताचा वेटलिफ्टर गुरदीप सिंगने 109 + किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. गुरदीपने जिंकलेल्या पदकामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील पदक संख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 पदकांवर पोहचली आहे. गुरदीपने एकूण 390 किलो वजन उचलले. गुरदीपने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 388 किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा होती. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेपेक्षा दोन किलो वजन जास्त उचलले. दरम्यान, वेटलिफ्टिंग पुरूष 109 + किलो वजनीगटात पाकिस्तानच्या महमद नूर दस्तगिर बट्टने एकूण 405 किलो वजन उचलत गेम रेकॉर्डसह सुवर्ण पदक पटकावले. तर न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने एकूण 394 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.

गुरदीपने राष्ट्रकुल स्पर्धेच्या 109 + किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात 167 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. त्यानंतर गुरदीपने दुसर्‍या प्रयत्नात 167 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. तिसर्‍या प्रयत्नात गुरदीपने वजन वाढवत 173 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यात यश आले नाही. त्यामुळे स्नॅच फेरीत गुरदीप इंग्लंडच्या गॉर्डन शॉ सोबत संयुक्तरित्या तिसर्‍या क्रमांकावर राहिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा