बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत एकूण 18 पदके जिंकली आहेत. बॉक्सर अमित पंघाल 48 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. बॉक्सिंगशिवाय हॉकी, लॉन बॉल, स्क्वॉश, अ‍ॅथलेटिक्स यासारख्या इतर स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत. महिला 60 किलो लाईटवेट वजनीगटात भारताच्या जासमिनने न्यूझीलंच्या ट्रॉय गारटॉनचा 4 – 1 असा पराभव करत उंपात्य फेरी गाठली. तिने भारताचे बॉक्सिंगमधील अजून एक कांस्य पदक निश्चित केले. बॉक्सिंग 51किलो (फ्लायवेट) वजनीगटात भारताच्या अमित पांघलने स्कॉटलंडच्या लेनॉन मुलिगॅनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने भारताचे कांस्य पदक नक्की केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा