नवी दिल्ली : सार्वजनिक जीवनात वावरताना सैन्य दले आणि जवानांची भूमिका काय असली पाहिजे? यावर सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले. सैन्य दले देशाच्या सुरक्षेसाठी असतात. त्यांनी नागरिकांवर हल्ले करू नयेत, असे सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले.

एका प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने एका लष्करी अधिकार्‍याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला केंद्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणाची दखल घेत नागरिक लष्कराला आव्हान देऊ शकतात, असे तुम्हाला वाटते का? असा सवाल करत केंद्राचा अर्ज फेटाळला; तसेच अपील प्रलंबित असेपर्यंत अधिकार्‍याला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षण दले हे देशाचे रक्षण करण्यासाठी असतात. व्यक्तींवर हल्ला करणे, अराजकता पसरवणे, बुलडोझर चालवणे इत्यादींसाठी नाही. आम्ही निकालावर पूर्णपणे समाधानी आहोत आणि तुम्हाला या कारवाईचा सामना करावाच लागेल, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा