१३ जणांचा होरपळून मृत्यू, ४० गंभीर जखमी

बँकॉक : बँकॉकच्या एका नाइटक्लबमध्ये भीषण आगीची घटना घडली. या अग्नीतांडवात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४० हून अधिक जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरिक थायलंडचेच रहिवासी असल्याचे समजते.

थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला चोनबुरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात हा नाइट क्लब आहे. माउंटन बी असे या नाइट क्लबचे नाव आहे. हा नाइट क्लब तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होता. इथे मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटकही जात असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून या घटनेची भीषणता समोर येते.

नाइट क्लबला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावरा पळत होते. या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा