पुणे : बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून होणारी वाहतूक पीएमपीएमएलकडून पूर्ववत करण्यात आली आहे. या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल केला होता. मात्र या निर्णयामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे पीएमपीएमएलने या दोन्ही मार्गावरील बस वाहतूक पूर्ववत केली असून गुरूवार (दि.4) पासून पुन्हा या मार्गावरून बस सेवा सुरू होणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बीजीराव रोड आणि शिवाजी रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएलने 28 जुलै पासून संचलनात असलेल्या या दोन्ही मार्गांमध्ये बदल केला होता. बाजीराव रोडने जाणार्‍या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड मार्गे तर शिवाजी रोड मार्गावरून येणार्‍या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन, टिळक रोड मार्गे असा प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्यात आला होता. यामुळे 508 फेर्‍यांच्या मार्गात बदल झाला होता. मात्र विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलने या मार्गांवरून होणारी वाहतूक पूर्ववत केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा