मुंबई : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत पुन्हा आणखी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो 6 रुपयांनी वाढवले आहेत. तर पीएनजीमध्ये किलोमागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीचे दर 86 रुपये प्रतिकिलोवर, तर पीएनजीचे दर 52.50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये महिन्याभरात दुसर्‍यांदा वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयांने खरेदी करावा लागेल. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत आहे.

नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षाही सीएनजी महाग

इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता. नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकला जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपुरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये उछॠ चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे आणि डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे.

डिझेलच्या निर्यात करात पाच रुपयांनी कपात

नवी दिल्‍ली : भारतीय तेल कंपन्यांच्या निर्यातीवरील नफ्यावरील कर अर्थात विंड फॉल टॅक्समध्ये सरकारने कपात केली आहे. त्यात डिझेल आणि विमानाच्या इंधनाचा समावेश असून देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील करात वाढ केली आहे.

भारतातून निर्यात होणार्‍या डिझेलवरील करात प्रति लीटर पाच रुपयांची कपात केली. पूर्वी तो प्रति लीटर 11 रुपये एवढा आहे. या बाबतचा अध्यादेश काढण्यात आला. पेट्रोलच्या निर्यातीवर शून्य टक्के कर पूर्वीप्रमाणेच आहे. या निर्णयामुळे देशाअंतर्गत उत्पादित कच्च्या तेलाची किंमत प्रति टन 17 हजार वरून 17 हजार 750 रुपये झाली आहे.. त्याचा फटका ओएनजीसी आणि वेदांता या कंपन्यांना बसला आहे. जुलैमध्ये वित्तीय तूट वाढत असल्याने तसेच वाढती महागाई व रूपयांची कमी, जास्त होणारी किंमत पाहता हा निर्णय घेतला. आयात आणि निर्यातीत मोठी तफावत गेल्या दोन महिन्यात झाली. जुलैमध्ये आयातीत 43.59 टक्के वाढ, तर निर्यात 0.76 टक्के कमी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा