बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू लव्हप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. हे भारताचे एकूण 14वे तर वेटलिफ्टिंगमधील नववे पदक ठरले आहे. त्याने स्नॅचमध्ये 163 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 355 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकले. कॅमेरूनच्या ज्युनियर पेरीस्लेक्सने 361 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर सामोनच्या जॅक हिटिला याने एकूण 358 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

भारताच्या लव्हप्रीत सिंग सर्व सहा प्रयत्नांमध्ये अतिशय सराईतपणे खेळ केला. स्नॅचमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात 157 किलो वजन उचलले, तर दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रयत्नात अनुक्रमे 161 आणि 163 किलो वजन उचलले. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्या प्रयत्नात 196 किलो वजन उचलले. तर, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रयत्नात 189 आणि 192 किलो वजन उचलले. 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टिंगपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे.
मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउली यांनी स्वर्ण, संकेत महादेव सरगर, बिंदियारानी देवी आणि विकास ठाकुर यांनी रौप्य तर गुरुराजा ठाकुर, हरजिंदर कौर आणि लव्हप्रीत सिंग यांनी कांस्यपदक पटकावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा