मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना नुकतीच अटक केली. त्यानंतर, ईडीने राऊत यांच्या दोन ठिकाणांवर मंगळवारी छापे घातले. दुसरीकडे, नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा घातला.
पत्राचाळ गैरव्यहारप्रकरणी विशेष न्यायालयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने राऊत यांना चार वेळा समन्स बजावले होते. त्यापैकी, ते केवळ एक वेळा चौकशीस हजर झाले होते. त्यामुळे ईडीने त्यांना अटक केली. ईडीच्या अधिकार्‍यांनी राऊत यांच्या घरी रविवारी छापा घातला होता. त्यानंतर, दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.राऊत यांच्या अटकेचे संसदेतही पडसाद उमटले. सलग दुसर्‍या दिवशी शिवसेनेच्या सदस्यांनी राऊत यांचा मुद्दा लावून धरला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा