पुणे : सीएनजी दरवाढीने किलोचा दर 91 रूपयांवर पोहचला आहे. या दरवाढीस केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. सततच्या दरवाढीने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. दरवाढीविरोधातील रिक्षा चालकांचा संताप केंद्र सरकारपर्यंत पाहचविण्यासाठी रिक्षा चालक खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर येत्या मंगळवारी सकाळी मोर्चा काढणार आहेत. तसेच दुपारपर्यंत रिक्षाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
शहरात सीएनजी पंपांची संख्या मर्यादित आहे. तरीही तासनंतास रांगेत थांबून रिक्षा चालकांनी सीएनजी गॅस भरला. आता कुडे रांगेतून रिक्षा चालकांनी सुटका होत असताना दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. अगदी अलीकडे पर्यंत सीएनजीचा किलोचा दर 55 रूपये होता. नंतर तो 68 रूपये करण्यात आला. 68 नंतर 73, 75 , 83, 85 व आता 91 रुपये किलो पर्यंत वाढ केली आहे. राज्य सरकारने कर कमी केला नसता, तर सीएनजीच्या दराने आजच शंभरी पार केली असती. दरवाढीबाबत रिक्षा चालकांच्या भावना तीव्र आहेत. या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी, सकाळी साडेदहा वाजता बुधवार पेठेतील मजूर अड्डा येथून महागाईविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.
सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालक हवालदिल झाला आहे. सीएनजी दर नियंत्रित करा. सीएनजीवरील उत्पादन कर कमी करा. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीसाठी अनुदान मिळाले पाहिजे. देशात उत्पादित होणर्‍या सीएनजी दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दराप्रमाणे ठरवणे बंद करा. हा दर त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित असावा. या दराची आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून आयातीत सीएनजीदराची सरासरी करून अंतिम दर ठरवावा. अशा मागण्या रिक्षश चालकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा