पीएमपीएमएलकडून १२ मिडी बसेस उपलब्ध

पुणे : भीमाशंकर येथे दर्शनाला जाणार्‍या भाविकांना भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिरापर्यंत 24 तास शटल सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडून श्रावण मिहन्यातील प्रत्येक रविवारी आणि सोमवारी 12 मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची जास्त गर्दी असते. त्यामुळे या भाविकांच्या सोईसाठी पीएमपीएमएलकडून शटल सेवेअंतर्गत निगडी डेपोतील डिझेलवर धावणार्‍या 12 मिडी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी आणि सोमवारी पहाटे चार वाजता या बस निगडी डेपोतून निघतील व रात्री उशिरा उशिरा डेपोत परत येतील.

प्रवासादरम्यान बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी ब्रेकडाऊन व्हॅनही त्याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. भीमाशंकर येथील पार्किंग ते भीमाशंकर मंदिरापर्यंतच्या बससेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले.

या दिवशी उपलब्ध असणार बस सेवा
7 ते 8 जुलै
14 ते 16 जुलै
21 ते 22 जुलै

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा