पिंपरी : चिंचवड परिसरातील लिंकरोडवरील माणिक कॉलनी येथे काही पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना काही विकृत व्यक्तींनी विष देऊन मारले आहे. हा प्रकार गेले दोन तीन दिवस घडत आहे. पोलिस आणि पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शुक्रवारी नुकत्याच व्यायलेल्या एका कुत्रीला विष दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचे दूध प्यायल्यामुळे पिल्लांचा जीव गेला. दुसर्‍या दिवशी पुन्हा येथील ‘मोती’ नावाचा कुत्रा वेदनेने ओरडू लागल्यामुळे तेथील प्राणी प्रेमी नवीन हेगडे, प्रसाद भूमकर, नकुल भोईर, तुषार आढारी यांनी मोतीला दवाखान्यात नेले.
त्यावेळी डॉ. गोरे यांनी मोतीला तपासल्यावर त्यांनी सांगितले की त्याला विष खायला घातल्यामुळे त्रास त्याला होत आहे. त्याला नेहरूनगर येथील हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यास सांगितले. परंतु काल सकाळी त्याचा मृत्यू झाला. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज तपासून अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा दाखल करणार आहोत असे भोईर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा