नागरिक त्रस्त; पालिका प्रशासन सुस्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, हिवतापा यासारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून 29 जुलैपर्यंत शहरात 503 डेंग्यूचे संशयित रुग्ण आणि 9 हजार 279 हिवतापसदृष्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील ही आकडेवारी आहे. नागरिक साथीच्या आजारांनी बेजार झालेले असताना पालिका प्रशासन मात्र ढीम्म आहे.

मागील पाच वर्षात शहराचे स्मार्टसिटीत रुपांतर करण्याच्या नादात शहरात जी खोदकामे करण्यात आली ती शहरात सांडपाण्याची डबकी निर्माण करण्यास कारणीभूत ठरली आहेत.

जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने शहरात अनेक जागी पाण्याची डबकी तयार झाली. त्यामध्ये डासांची पैदास वाढल्याने साथीचे आजार वाढू लागले. प्राप्त माहितीनुसार 29 जुलैपर्यंत डेंग्यूचे 503 संशयित रुग्ण आढळले.

असे असताना महापालिका प्रशासन धुरळणी, औषध फवारणी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे.महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्मार्टसिटीचे दिखाऊ कार्यक्रम आणि बैठकांमध्ये गर्क असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. असे असताना महापालिकेचे अधिकारी मात्र, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. आसपास डबकी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा असा उपदेश नागरिकांना करून उंटावरून शेळ्या हाकण्याचे उद्योग करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा