पुणे : महापालिकेचा ठराव झाला नसताना आणि कोणतीच परवानगी नसताना माजी नगरसेवक नाना भागगिरे यांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे नाव उद्यानाला देण्याचा प्रयत्न फसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रमच रद्द केला. त्याचबरोबर उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याच्या सूचना भागनिरे यांना दिल्या.

महापालिकेची कोणतीही परवाणगी न घेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी खुद्द मुख्यमंत्री यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले. कोणत्याही महापालिकेच्या विकास प्रकल्पाला नाव द्यायचे असल्यास त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. यासाठी महापालिकेच्या नाव समितीमार्फत प्रस्ताव देवून त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागले. नियमाप्रमाणे महापालिकेच्या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी बोलावणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री शिंदे आज विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येणार होता.

मुख्यमंत्री पुण्यात आल्यानंतर माध्यमांनी त्यांना बेकायदेशीर पध्दतीने उद्यानाचे नामकरण करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आणली अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाना भानगिरे यांना थेटच विचारणा केली. माझ्या नावाने उद्यान कशासाठी बनवले. उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव द्या अशा सूचना केल्या. माजी मंत्री उदय सामंत यांनी सुध्दा हे प्रकरण सावरण्याचे प्रयत्न केला. अखेर उद्यानाच्या नामकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

उद्यानाच्या नामकरणाचा कोणताच प्रस्ताव महापालिकेला मिळालेला नाही. अगोदर अन्य नाव देण्याचा नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या सुध्दा प्रसिध्द झाल्या. राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र सामाजिक संघटनांनी याला विरोध केला. खुद्द मुख्यमंत्री यांनीच हा कार्यक्रम रद्द केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा