मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्‍वासन

पुणे : आंबिल ओढ्यानजीक सीमाभिंत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

सन 2019 मध्ये शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर येऊन मोठे नुकसान झाले होते. या ओढ्यालगत असलेल्या सोसायट्यांच्या सीमाभिंती पाण्याच्या लोंढ्यामुळे कोसळून सोसायट्यांमधील वाहनतळांतील वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. प्रायमूव्ह संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या भागात 30 किलोमीटर लांबीच्या सीमाभिंती असून, त्यामध्ये काही खासगी सोसायट्यांचाही समावेश आहे. या 30 कि.मी. लांबीच्या सीमाभिंती बांधण्याची बाब समोर आली. या पार्श्वभूमीवर आंबिल ओढ्यानजीक सीमाभिंत बांधण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप निधी मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवीर घेतली. या बैठकीत आमदार माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील राज्य शासनाकडे सीमाभिंतीबाबत निधी देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने निधी देण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, या ओढ्यालगत असलेल्या सोसायट्यांच्या सीमाभिंती पाण्याच्या लोंढ्यामुळे कोसळून सोसायट्यांमधील वाहनतळांतील वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या भागात 30 किलोमीटर लांबीच्या सीमाभिंती असून, त्यामध्ये काही खासगी सोसायट्यांचाही समावेश आहे. या 30 कि.मी. लांबीच्या सीमाभिंती बांधण्यासाठी महापालिकेने निधी देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवला होता. मात्र, खासगी सोसायट्यांच्या भिंती उभारण्याची तरतूद कायद्यात नसल्याने जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तेव्हा फेटाळला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा