सैफ अदेलचे नाव चर्चेत

न्यूयॉर्क : जवाहिरीनंतर अल-कायदाचा नवा म्होरक्या कोण असेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या एफबीआयच्या रडारावर असलेला आणि ओसामा बिन लादेन याचा एकेकाळचा सुरक्षा प्रमुख सैफ अल-अदेलकडे ही जबाबदारी देण्यात येईल, असा अंदाज आहे. अदेलसह अब्दल-रहमान अल-मगरेबी आणि अल-कायदा इन द इस्लामिक मगरेबचा यझिद मेब्राक आणि अल-शबाब संघटनेेचा अहमद दिरीये यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. परंतु घोषणा झालेली नाही.

सैफ अदेल २००१ पासून एफबीआयच्या रडारावर आहे. त्याला पकडून देणार्‍यास १० दशलक्ष डॉलरचे बक्षीसही जाहीर केलेे आहे. इजिप्तचा हा माजी लष्करी अधिकारी अल कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनुसार, सैफ अल-अदेल १९८० मध्ये मकतब अल-खिदमत या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. अदेलने या वेळी लादेन आणि जवाहिरी यांची भेट घेतली आणि त्यांच्या इजिप्शियन इस्लामिक जिहाद या गटात सामील झाला. १९८०च्या दशकात रशियन सैन्याविरुद्ध युद्ध देखील केले.

सैफ अदेलचे

सैफ अल-अदेल एकेकाळी ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. १९९३ पासून अमेरिकेचे सैन्य अदेलचा शोध घेत होते जेव्हा त्याने मोगादिशू, सोमालिया येथे अमेरिकन सैन्य आणि हेलिकॉप्टरवर हल्ला केला होता. या ब्लॅक हॉक डाऊन अपघातात १८ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अल-अदेल ३० वर्षांचा होता.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अदेल हा अल-कायदाचा मुख्य रणनीतीकार बनला आहे. मात्र, मध्य पूर्व इन्स्टिट्यूटच्या मते, तो इराणमध्ये असल्यामुळे त्याला दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनवणे गुंतागुंतीचे होईल. ब्लॅक हॉक डाऊनच्या घटनेपासून अदेल हा इराणमध्ये आहे.

हेलिफायर क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील ड्रोन हल्ल्यांमध्ये एक विशेष क्षेपणास्त्र वापरले. त्याचे नाव हेलिफायर आर ९ एक्स आहे. ते डागल्यानंतर या क्षेपणास्त्राचा स्फोट होतो. परंतु लक्ष्यावर आदळल्यानंतर त्यातून चाकूसारखी हत्यारे बाहेर पडतात आणि संबधित व्यक्‍तीच्या शरीरात घुसतात. त्यामुळे अन्य नागरिकांचे नुकसान होत नाही. पण, अचूकपणे लक्ष्यांवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात अशा प्रकारची दोन क्षेपणास्त्रे वापरली होती.

हेलिफायर क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा