पिंपरीतील विभागीय कार्यालयात टिळक पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दैनिक केसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खाडे बोलत होते.

यावेळी शहराच्या माजी महापौर उर्षा उर्फ माई ढोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खाडे पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची प्रेरणा नागरिकांना मिळावी म्हणून शिवजयंती उत्सवही सुरू केला. एका अर्थाने हे उत्सव म्हणजे लोकशिक्षणाच्या अनौपचारिक शाळाच झाल्या होत्या, असेही खाडे यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे नेते अशोक मोरे म्हणाले, लोकमान्य टिळक शिक्षणाकडे राष्ट्राच्या उन्नतीचे महत्त्वाचे साधन म्हणून पाहत होते. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थांमुळेच पुण्याला शिक्षणाची परंपरा निर्माण झाली. राष्ट्रीय शिक्षण हा भारतातील राजकीय चळवळीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ आहे, असे टिळकांचे मत होते.

माजी महापौर माई ढोरे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाविषयी जागृती घडवून त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणारे टिळक हेच शेतकर्‍यांचे पहिले नेते होते, असे प्रतिपादन केले. टिळकांनी इंग्रज सरकारच्या काळात दुष्काळ जितका नैसर्गिक होता. त्यापैक्षा जास्त तो मानवनिर्मित होता, हे आपल्या अग्रलेखाव्दारे अधोरेखित केले.

पिंपरी चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, काँगेसचे सचिन साठे, शहराध्यक्षा सायली नढे, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अमर नाणेकर,रोहन वाघमारे, कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उमेश खंदारे, आनंद साठे, विराज साठे, सुमित कर्नावट, गणेश अंत्रे, भाऊसाहेब मुकुटमल, पांडुरंग जगताप, मिलिंद फडतरे, आशाताई भोसले, किरण नढे, विरेंद्र गायकवाड, लक्ष्मण रुपनर, मराठा सेवासंघाचे अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायीसमितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र पवार, तानाजी जवळकर, मानवता हिताय सोेशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंह चौधरी, रेजिना फ्राान्सिस, धर्मावती गुप्ता, वैशाली मिडगुळे, निर्मला जगताप, शोभा भराडे, शिवसेनेचे सतीश मरळ-देशमुख, दिलीप पवार. सामाजिक कार्यकर्ते बाबर शेख, राजू खैरारिया, ख्वाजाभाई कुरेशी, कुणाल गाडे, बाबू भंडारी, राजन नायर, सागर चरण, दिव्या चरण, पालिकेचे अधिकारी अनिल खामकर, प्रफुल्ल पुराणिक आपला आवाज न्यूज चॅनेलचे संपादक अतुलसिंह परदेशी, संगिता तरडे, पत्रकार सतीश जकाते, बाबू कांबळे, जितेंद्र गवळी, दादा आढाव, मंदा बनसोडे, मारूती बाणेवार, अनिल वडघुले, विनायक गायकवाड, सुरज साळवे, प्रवीण शिर्के, राकेश पगारी यांनी केसरीच्या कार्यालयात येऊन लोकमान्यांना आदरांजली वाहिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा