नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, अशी विनंती करणारे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाचे सर्व अर्ज फेटाळून लावण्यात यावेत, अशी विनंतीही शिंदे यांनी केली आहे. लोकशाही पद्धतीने बहुमताने घेतलेल्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये, अशी विनंतीदेखील शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांना सोबत घेत भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. तसेच, आम्हीच खरी शिवसेना, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तसेच, शिंदे गटाने ‘धनुष्य-बाण’ चिन्हावरही दावा केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आयोगाने निर्णय घेऊ नये, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यावर, शिंदे यांनी निवडणूक आयोगासच शिवसेना नेमकी कोणाची हे ठरवू द्या, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा