ओतूर, (वार्ताहर) : श्री क्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील श्रीकपर्दिकेश्वर हे जागृत स्वयंभू शिवलिंग नवसाला पावणारे ओतूरचे ग्रामदैवत आहे. हजारो वर्षापासून गाभार्‍यातील शिवलिंगावर सोमवारच्या संख्येनुसार कोरड्या तांदळाच्या उभ्या कलात्मक पिंडी असल्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार याही वर्षी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगावर उभी तांदळाची एक उभी कलात्मक उभी पिंड साकारली आहे.

यावर्षी ब्राह्म मुहूर्तावर शिवलिंगावर महाअभिषेक व पूजा करण्यात येऊन महाआरती प्रथम दर्शन घेणारे दाम्पत्य चंद्रकांत कवडे व पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, राजेंद्र डुंबरे, गांधी पानसरे, जितेंद्र डुंबरे, सागर दाते, पांडुरंग ताजणे, यतीन नेट, सचिन तांबे उपस्थित होते. महाआरती झाल्यावर भाविकांसाठी मंदिर गाभारा खोदण्यात आला. पहाटे 4 वाजेपासूनच भाविकांंनी दर्शन बारीत रांगा लागल्या होत्या. स्वयंसेवक व पोलिसांनी रांगेने भाविकांना आतमध्ये सोडत होते. ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा