तोर्शवन : फॅरो बेटांवर 100 बॉटलनोज डॉल्फिनची क्रूर शिकार करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर, बॉटलनोज डॉल्फिनची 120 वर्षांतील सर्वात मोठी सामूहिक शिकार असल्याचे मानले जाते. या डॉल्फिनला प्रथम किनार्‍यावर नेण्यात आले आणि नंतर चाकू, भाले आणि इतर धारदार शस्त्रांनी मारण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉल्फिन मारल्यानंतर किनार्‍यावरील पाणी लाल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शिकार करण्याचा हा प्रकार फारो बेटांच्या इतिहासाचा पारंपरिक भाग आहे. मात्र वन्यजीव संघटनांकडून त्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे. ही डॉल्फिनची शिकार केवळ लज्जास्पद आहे आणि केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संतापाचे कारण आहे, सी शेफर्ड या शिकारीचे चित्रीकरण करणार्‍या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा