नवी दिल्ली : दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी संजय अरोरा यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते इंडो तिबेटियन सीमा पोलिस दलाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. अरोरा यांची विद्यमान पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांच्या जागी नियुक्ती केली आहे.
अरोरा यांनी विविध राज्यांसाठी अनुक्रमे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम, दिल्ली आणि केंद्र शासित प्रदेशातील पोलिसांशी समन्वयक म्हणूनही काम पाहणार आहेत. ते 1988 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. तामिळनाडूत विशेष कृती दलात कार्य करताना त्यांनी कुख्यात चंदन चोर विरप्पनविरोधातील कारवाईत भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना शौर्यपदकाने सन्मानित केले होते.
