वॉशिंग्टन : चीनचे लाँग मार्च 5बी रॉकेट पृथ्वीवर आदळले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच रॉकेट जळून खाक झाले. पण मध्यंतरी रविवारी रात्री रॉकेटचे काही तुकडे पृथ्वीवर पडले. 25 टन वजनाच्या या रॉकेटने 24 जुलै रोजी चीनचे अपूर्ण राहिलेले तियांगॉन्ग स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी मॉड्यूलसह झेप घेतली होती. हे रॉकेट अवकाशातून पृथ्वीवर पडण्याची भीती शास्त्रज्ञांना होती. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेले उपग्रह आणि रॉकेट कधीकधी अवकाशात अनियंत्रित होतात. त्यांचा मलबा पृथ्वीवर पडतो, त्यामुळे जगाचा मोठा भाग प्रभावित होऊ शकतो. चीनच्या अंतराळ संस्थेने सांगितले की, लाँगमार्च 5बी रॉकेटचे बहुतांश भाग वातावरणात जळून गेले. रॉकेट पृथ्वीवर परतल्याने समुद्रात पडण्याची शक्यता जास्त असल्याने कोणालाही कोणताही धोका नाही, असे चीन सरकारने म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा