मनिला : फिलिपाईन्सचे माजी अध्यक्ष फिडेल वाल्देझ रामोस यांचे रविवारी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. कोरिया आणि व्हिएतनामविरोधातील युद्धात ते सेनापती होते. हुकूमशाह फडिैनांड मार्कोस (सिनिअर) यांच्या राजवटीत उच्च अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर ते देशाचे सर्वोच्च नेते बनले.
मार्कोस यांच्यापासून फरकत घेतल्यानंतर रामोस देशाचे नायक बनले. राष्ट्रीय पोलिस दलाचे त्यांनी नेतृत्व करत 1986 मध्ये बंड करून हुकूमशाह मार्कोस यांची राजवट उलथवून टाकत देशाचे नेतृत्व केले. मार्कोस यांच्या राजवटीत मार्शल लॉ लागू केल्याचा ठपका त्यांच्यावर कायम राहिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा