काठमांडू : नेपाळमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली. काठमांडूपासून 147 किमी अंतरावर भूकंप झाला. नेपाळच्या वेळेनुसार सकाळी 8.13 वाजता भूकंप झाला. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरनुसार, खोटांग जिल्ह्यातील मार्तिम बिर्ता नावाच्या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळच्या 10 किमी त्रिज्येमध्ये मोजण्यात आला. नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपामुळे सध्यातरी कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. अलीकडील काही भूकंपांमुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा