न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. सुमारे 1 लाख 50 हजार जणांना मंकीपॉक्स आजार झाला आहे.
न्यूयॉर्कचे महापौर एरीक अ‍ॅडम आणि न्यूयॉर्क शहर आरोग्य आणि मानसिक उपचार विभागाचे आयुक्‍त अश्‍विन वासन यांनी शनिवारी मंकीपॉक्स आजारामुळे आणीबाणी जाहीर केली. तसेच तातडीने लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचे आदेश दिले आहेत. आजाराचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना अधिकाधिक लशीचे डोस पुरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा