मुंबई : बनावट पासपोर्टचा वापर करून दोन बांगलादेशी दहशतवादी मुंबईत आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांनी पावले उचलली आहेत.

हे दहशतवादी सर्बियातून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार होते. परंतु त्यांना तेथे रोखण्यात आले होते, अशी माहिती शनिवारी अधिकार्‍यांनी दिली.

परदेशातून येणार्‍या नागरिकांची माहिती देणार्‍या विभागाला प्राप्‍त झालेल्या एका ईमेलद्वारे मुंबई पोलिसांना शी माहिती मिळाली की, 18 जुलै रोजी दोन बांगलादेशी दहशतवादी बनावट पासपोर्टचा वापर करून सुजान सरकार आणि समीर रॉय या नावाने भारतात येत आहेत. त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील ई मेलमध्ये केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिम उघडली. परंतु तपासत असेही उघड झाले की, त्यांना सर्बिया येथील विमानतळावर पुरेशी कागदपत्रे नसल्यामुळे विमानात बसण्यापासून रोखण्यात आले. परंतु पोलिसांना असा संशय आहे की, हे दहशतवादी मुंबई शहरात आले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे ते बनावट पासपोर्टचा वापर करून भारतात आले आहेत. तसेच बनावट पासपोर्ट बनविणार्‍या दोन एजंटापैकी एकाने अंतर्गगत द्वंदातून हा ई मेल पाठविला असावा, असा अंदाज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा