मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण केला होता. त्याविरोधात ठाण्यातील धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली असून सोमवारी सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 7 जुलैला मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही. शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यामध्ये उल्लंघन आहे. असे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा