दुहेरीकरणाच्या कामामुळे 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक
पुणे : सोलापूर विभागातील भिगवण परिसरात रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी 1 ते 18 ऑगस्टदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल 48 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सहा रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे विविध रेल्वे मार्गावरून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
1 ऑगस्टपासून भिगवण ते वाशिम दरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल, तर काही गाड्या मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत न नेता अलीकडच्या रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यात पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे, पुणे-कन्याकुमारी, कन्याकुमारी-पुणे, भुवनेश्वर-पुणे, पुणे-भुवनेश्वर आदीसह अन्य गाड्यांचा समावेश आहे.
दादर-पंढरपूर ही 1, 5, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. पंढरपूर-दादर 2, 6, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी, सीएसएमटी-गदग ही गाडी 4 ते 8 ऑगस्ट, गजग-सीएसएमटी 5 ते 9 ऑगस्ट, सोलापूर-सीएसएमटी 4 ते 8 ऑगस्ट, सीएसएमटी-सोलापूर 5 ते 9 ऑगस्ट, सीएसएमटी-चेन्नई सेंट्रल 4 ते 8 ऑगस्ट, चेन्नई सेंट्रल-सीएसएमटी 5 ते 9 ऑगस्ट, सोलापूर-पुणे 5 ते 9 ऑगस्ट, पुणे-सोलापूर 5 ते 9 ऑगस्ट, हैदराबाद-सीएसएमटी – 4 ते 8 ऑगस्ट, सीएसएमटी-हैदराबाद 5 ते 9 ऑगस्ट, कन्याकुमारी-पुणे 6 ते 8 ऑगस्ट, पुणे-कन्याकुमारी 7 ते 9 ऑगस्ट, काकिनाडा-एलटीटी 3 ते 6 ऑगस्ट, एलटीटी-काकीनाडा 4 ते 7 ऑगस्ट, एलटीटी-कराईकल 6 ऑगस्ट, कराईकल-एलटीटी 8 ऑगस्ट, एलटीटी-मदुराई 3 ऑगस्ट, मदुराई-एलटीटी 5 ऑगस्ट, एलटीटी-चेन्नई 8 ऑगस्ट, चेन्नई-एलटीटी 9 ऑगस्ट रोजी रद्द असणार आहे.
पुणे-सोलापूर 20 जुलै ते 18 ऑगस्ट, सोलापूर-पुणे 25 जुलै ते 18 ऑगस्ट, पुणे-भुवनेश्वर 2 ऑगस्ट, भुवनेश्वर-पुणे 4 ऑगस्ट, सिकंदराबाद-राजकोट 6, 8 आणि 9 ऑगस्ट, राजकोट-सिकंदराबाद 8, 10 आणि 11 ऑगस्ट, यशवंतपूर-बिकानेर 5 आणि 7 ऑगस्ट, बिकानेर-यशवंतपूर 7 आणि 9 ऑगस्ट, बाडमेर-यशवंतपूर 4 ऑगस्ट, यशवंतपूर-बाडमेर 8 ऑगस्ट, काकिनाडा-भावनगर 4 ऑगस्ट, भावनगर-काकिनाडा 6 ऑगस्ट, कोईंबतूर-राजकोट 5 ऑगस्ट, राजकोट-कोईंबतूर 7 ऑगस्ट, यशवंतपूर-जयपूर 4 ऑगस्ट, जयपूर-यशवंतपूर 6 ऑगस्ट, इंदोर-लिंगमपल्ली 6 ऑगस्ट, लिंगमपल्ली-इंदौर 7 ऑगस्ट, अहमदाबाद-चेन्नई 8 ऑगस्ट, चेन्नई-अहमदाबाद 10 ऑगस्ट, अहमदाबाद-चेन्नई 6 ऑगस्ट, चेन्नई-अहमदाबाद 12 ऑगस्ट, चेन्नई-एकतानगर 7 ऑगस्ट, एकतानगर-चेन्नई 10 ऑगस्ट, पोरबंदर-सिकंदराबाद 9 ऑगस्ट, सिकंदराबाद-पोरबंदर 10 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे मार्ग बदलणार
एलटीटी-विशाखापट्टणम 30 जुलै ते 9 ऑगस्ट, सीएसएमटी-त्रिवेंद्रम 5 ते 9 ऑगस्ट, सीएसएमटी-नागरसोल ही गाडी 5 ते 9 ऑगस्ट रोजी पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे धावेल. विशाखापट्टणम-एलटीटी 4 ते 8 ऑगस्ट, त्रिवेंदरम-सीएसएमटी 4 ते 8 ऑगस्ट, नागरसोल-सीएसएमटी 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे धावणार आहे.
या गाड्या हडपसरपर्यंतच येणार
बंगळुरू-सीएसएमटी 4 ते 8 ऑगस्ट रोजी सोलापूरपर्यंतच धावेल. सीएसएमटी-बंगळुरू 5 ते 9 ऑगस्ट रोजी सोलापूर येथून सुटेल. हैदराबाद-हडपसर 4, 6 आणि 8 ऑगस्ट रोजी हडपसरला न येता कुर्डुवाडी पर्यंतच धावेल. हडपसर-हैदराबाद 5, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी हडपसर ऐवजी कुर्डुवाडी येथून सुटेल. नांदेड-पनवेल 4 आणि 8 ऑगस्ट रोजी कुर्डुवाडी पर्यंतच धावेल. पनवेल-नांदेड 5 आणि 9 ऑगस्ट रोजी कुर्डुवाडी येथून सुटेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा