पुणे : शाळकरी मुलीला दररोज घरी सोडवणार्या स्कूल बसचालकाने दहावीच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कोंढवा-उंड्री परिसरात मार्च महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पंधरा वर्षाच्या पिडीत मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सोमेश्वर घुले पाटील (वय 35, वडाची वाडी, उंड्री) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली.
पिडीत मुलीला शनिवारी शाळेमधून घरी येण्यासाठी बराच उशीर झाला होता. त्यामुळे, शाळेतून घरी येण्यास उशीर का झाला?, असा जाब वडिलांनी विचारला. त्यावेळी आपल्यावर चौघांनी अत्याचार केल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर फक्त बसचालका घुले यानेच अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. बसचालकासोबत पिडीत मुलगी नात्यामध्ये होती. त्यातून त्याने मार्च महिन्यापासून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केला. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला नात्यात राहणार का?, असे विचारले होते.