नासाने शेअर केला पृथ्वीचा फोटो

युरोप, उत्तर अफ्रिका, मिड- ईस्ट आणि आशिया या भागांत भीषण उष्णतेने कहर केला आहे. जून आणि जुलैमध्ये तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जगभरातील बऱ्याच देशांमध्ये ४० अंशापर्यंत पारा पोहचला आहे. तापमानात होत असणारा बदल नासाने टिपला. नासाने अलीकडेच पृथ्वीचा एक फोटो शेअर केला आहे. नेहमी निळ्या रंगात दिसणारी पृथ्वी आता लाल भडक रंगात दिसत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

नासाने शेअर ट्विट केला पृथ्वीचा फोटो नसून तो एक नकाशा आहे. १२ जुलै २०२२ रोजीचा हा नकाशा आहे. यामध्ये पृथ्वी पूर्व गोलार्ध रेषेच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान दिसत आहे. सध्या ते तापमान ४० अंशाच्यावर आहे. हा नकाशा गोडार्ड अर्थ ऑब्जरविंग सिस्टम (GOES)च्या ग्लोबल मॉडलच्या सहाय्याने प्राप्त झाला आहे.

या नकाशांनुसार, पृथ्वीची वायुमंडळ आणि परिसरातील वाढलेल्या उष्णतेच्या आधारे तापमान मोजले गेले आहे. नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये ग्लोबल मॉडेलिंग आणि ऍसिमिलेशनचे प्रमुख स्टीवन पॉसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नकाशात लाल रंग आहे त्या प्रदेशात तापमान वाढले आहे. तर, निळा रंग असलेले प्रदेशात तापमान कमी आहे, हे स्पष्ट दिसते.

मानवाकडून होणारे प्रदूषण, ग्रीनहाऊस गॅसमधून होणाऱ्या उत्सर्जनमुळे सातत्याने जलवायू परिवर्तन होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तापमानात वाढ होत आहे. पश्चिम युरोपमध्ये दुष्काळ पसरला आहे. उष्णता आणि दुष्काळ यामुळे पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्समध्ये काही जंगलात वणवा पसरला आहे. पोर्तुगालमध्ये ४५ अंशापर्यंत तापमानाचा पारा पोहोचला आहे. १४ जंगलात आग भडकली आहे.

चीनमध्ये तर रस्त्ये वितळत आहे. शांघाईत ४०.९ अंशापर्यंत तापमानाचा पारा पोहचला आहे. तिथे आद्रता वाढली आहे. इतकंच नव्हे तर नासाने आणखी दोन नकाशे शेअर केले आहेत. त्यात गेल्या ४६ वर्षांत पृथ्वी कशी बदलत गेली याचे चित्रण आहे. १९७६ ते २०२२ पर्यंत पृथ्वीचा रंग निळा होता तो लाल होत गेला. हे नासाने नकाशातून मांडले.

डोलोमाइटवर मोलाडा ग्लेशियर भीषण उष्णतेमुळं कोसळला आहे. तिथे झालेल्या हिमस्खलनामुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये पूर्ण देशात भीषण उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उत्तर अफ्रिकेतील ट्यूनिशियात उष्णतेच्या लाटेचा पिकांवर परिणाम झाला आहे. राजधानी ट्युनिसमध्ये १३ जुलै रोजी तापमान ४८ अंशापर्यंत पोहोचले होते. इराणमध्ये तापमान सर्वाधिक ५२ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा