नवी दिल्ली ः संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. पवार म्हणाले, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचे नाव उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. या बैठकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. अल्वा यांना विरोधी गटातील 17 पक्षांचा पाठिंबा असल्याचे पवार यांनी सांगितले. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि. 19 जुलै ही अंतिम मुदत असून 6 ऑगस्टला मतदान होणार आहे.यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा आहे, त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी राहणार आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा