नवी दिल्ली : देशात 20 हून अधिक राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवू शकते. देशातील 22 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आठ राज्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ आणि तेलंगणामधील प्रत्येकी एक नदी, महाराष्ट्रातील पाच नद्या, आसाम, बिहार आणि तेलंगणामधील प्रत्येकी तीन, आंध्र प्रेदश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात जोरदार पाऊस पडत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा