सिंगापूर : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल काल जिंकली. तिने सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत भारताच्या मालविका बनसोडचा पराभव केला. सायना नेहवालने 34 मिनिटे चाललेल्या या सामन्यात बनसोडचा 21-18, 21-15 अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सामन्याच्या दोन्ही गेममध्ये सायनाने आपले वर्चस्व कायम राखले. ती आता दुसर्‍या फेरीत दाखल झाली.

दुसर्‍या बाजूला सायना नेहवालचा पती परूपल्ली कश्यपला सिंगापूर ओपनमधील पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडळावा लागला. त्याला इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने 21-14, 21-15 असे पराभूत केले.

यापूर्वी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने देखील सिंगापूर ओपनची सुरूवात विजयाने केली. तिने बेल्जियमच्या लिआने टानचा पहिल्या फेरीत पराभव केला. सिंधूने आपला सामना 21-15, 21-11 असा सरळ गेममध्ये सहज जिंकला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा