गॉल : ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या दुसरा कसोटी सामना सध्या गालेच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने रविवारी जबरदस्त कामगिरी केली. श्रीलंकेने 149 षटकांत तब्बल 431 धावा करत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी श्रीलंकेचा युवा फलंदाज दीनेश चंडीमल याने तब्बल 232 चेंडूंचा सामना करत 118 धावा केल्या. त्याचे हे संयमी शतक श्रीलंकेला आघाडीवर घेवून गेले. त्याला साथ देताना दिमुख करूणारत्ने याने 86, तर कुशल मेंडीस याने 85 धावा केल्या. अ‍ॅन्जलो मॅथ्यू याने 52 धावा करत आपले अर्धशतक केले. कामिंदू मेंडीस याने 61 धावा केल्या. सर्व फलंदाजांनी एकत्रित येत चांगली कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ पिछाडीवर पडला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात आला. स्टीव्ह स्मिथ 145 धावांवर नाबाद राहिला, परंतु त्याला तळाच्या फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने सहा बळी मिळवले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा