गोळीबारानंतर आंबे यांना हृदयविकाराचा झटका

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला. शिंजो यांच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्याचे समजते. आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

जपानमधील नारा शहरात शिंजो आबे भाषण देत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते खाली स्टेजवर कोसळले. त्यांच्या शरीरातून रक्तही येत होते. शिंजो आबे अचानक स्टेजवर कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराला अटक केले असून तो ४१ वर्षांचा आहे.

शिंजो आबे यांच्या छातीवर गोळी झाडल्यामुळे ते स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सीपीआर देण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचे समजते.

शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. आबे यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. तसंच, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. गोळी झाडल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे समजते. त्यामुळे हा हल्ला कोणी घडवून आणला याबाबत तर्क- वितर्क काढले जात आहे.

शिंजो आबे यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय कारणास्तव आबे यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा देताना त्यांनी विनम्रपणे वाकून जपानी जनतेची माफी मागितली होती. तसंच, शिंजो आबे हे दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. आठ वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. भारताशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा