छातीत दुखू लागल्याने केले भरती

चेन्नई: दाक्षिणात्य अभिनेता चिनाय विक्रम याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला चेन्नई इथल्या कावेरी रुग्णालयात दाखल केली आहे. विक्रम मणिरत्न यांच्या बहुचर्चित ‘पोन्नियिन सेलवन’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे. विक्रमने छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या तब्येती संदर्भात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये चिनाय विक्रम याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते. परंतु तो ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथल्या डॉक्टरांनी,वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सध्या त्याच्यावर कावेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही बातम्यांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की विक्रमला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. त्यामुळे त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले.

विक्रम याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली. त्यानंतर त्याच्या चाहते ही चिंताग्रस्त झाले आहेत. विक्रमच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशा प्रार्थना केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या तब्येतीबाबत कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नका अशीही विनंती केली जात आहे.

ट्विटवरील काही ट्रेंड अभ्यासकांच्या मतानुसार विक्रमची प्रकृती स्थिर असून त्याला देखरेखी खाली ठेवले आहे. विक्रम सध्या मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. हा चित्रपटात येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विक्रम याचा ‘कदारम कोंडन’ हा सिनेमा खूपच लोकप्रिय झाला. चियान विक्रमने अलिकडेच कमल हासन यांच्या ‘विक्रम’मध्ये देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा