नावनोंदणीसाठी मुदतवाढ

पुणे : सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 2022 या वर्षात होणार्‍या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या नोंदणीत अधिकाधिक सहभाग वाढवा यासाठी विद्यापीठाने नावनोंदणीला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पदवीधरांना 14 जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना 13 जुलैपर्यंत तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी 10 जुलैपर्यंत मतदरनोंदणी करता येणार आहे. यापूर्वी नावनोंदणीसाठी अनुक्रमे 4, 3 जुलै व 30 जून 2022 अशी अंतिम तारीख देण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया 1 जून 2022 पासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नावनोंदणीसाठी लिंक –
https://election.unipune.ac.in/Ele­pp/ Registration/RgšRegistration2017.aspx

पन्नास हजारांहून अधिक नोंदणी

विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेसाठी दरवर्षी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार आतापर्यंत 20 हजार 437 जणांनी नव्याने नोंदणी केली आहे तर 30 हजार 254 जणांनी पुन्हा नोंदणी केली आहे. आजमितीला जवळपास 51 हजार जणांची यासाठी नोंदणी झाली आहे.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी धेय्य धोरण ठरविण्यात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची भूमिका मोठी आहे. यामुळे या निवडणुकीसाठी पदवीधर, शिक्षक, विभागप्रमुख आणि संस्थाचालक या सर्व घटकांच्या व्यापक सहभागातून या लोकशाही प्रक्रिया बळकट होतील.

  • डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा