चंडीगढ : भारतीय हद्दीत चुकून आलेल्या तीन वर्षांच्या पाकिस्तानी बालकाला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी पाकिस्तानी सैनिकांच्या हवाली केले.
पंजाबमधील फिरोजपूर भागात हे बालक भारतीय जवानांना आढळले होेते. बालक स्वत:ची माहिती देण्यास सक्षम नसल्याने त्याची काळजी जवानांनी घेतली. याबाबत पाकिस्तानी सैनिकांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तानकडे सोपविले. त्यामुळे सीमेवर भारतीय जवानांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा