क्व्लालंपूर : भारताच्या दोन अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांचे मलेशिया ओपन सुपर 750 मधील पहिल्या फेरीचे सामने काल झाले. यामध्ये पीव्ही सिंधूने विजय मिळवला तर लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला पराभवाचा धक्का सहन करावा लागला माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या चोचुवांगचा 21-13, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. तर दुसरीकडे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणार्‍या सायना नेहवालचा जागतिक क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर असणार्‍या अमेरिकेच्या आयरिस वांगने 11-21 17-21 असा पराभव केला. सातव्या स्थानावर असणारी सिंधू आता थायलंडच्या 21 वर्षाच्या चैवानशी लढणार आहे. जागतिक ज्यूनियर रँकिंगमध्ये चैवान अव्वल स्थानावर होती. याचबरोबर बँकॉकमध्ये झालेल्या उबर कपमध्ये कांस्य पदक मिळवणार्‍या संघात देखील तिचा समावेश होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा