बीडच्या नागरिकाची पत्राद्वारे मागणी

औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरिकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मला काळजीवाहू मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे समर्थक 37 शिवसेना आमदार आणि अपक्ष 10 आमदारांसह आसामधील गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे बीडमधील दहीफळे येथील रहिवासी श्रीकांत गडाले यांनी राज्यपालांसाठी जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच राज्याला मुख्यमंत्री या नात्याने मदत केली नाही.

ते पत्रात म्हणतात, मी गेल्या दहा ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात आहे. शेतकरी आणि गरिबांसाठी मी काम केले आहे. पर्यावरणीय आपत्तीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई सरकारने तातडीने देण्याची गरज होती; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मलाच काळजीवाहू मुख्यमंत्री करावे. मी जनतेचे आणि शेतकर्‍यांचे, रोजगार आणि मजुरांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सेवेसाठी हजर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा