झोपतात कशा सर्व राशी
तारवटल्या डोळ्यांनी,
बदलत रहातो कुशी
अंथरुण भर लोळत लोळत,
झोपते मेष राशि ॥
कधी इथे झोप कधी तिथे,
सवय त्याची अशी,
खुट्ट होता ताडकन् उठते वृषभ राशि ॥
जाडजुड गादी हवी पलंगपोस मऊ ऊशी,
राजेशाही थाट, पाय चेपून घेते, मिथुन राशि ॥
दंगा गोंगाट असो किती झोप यांना येते कशी,
शांत गाढ माळरानीही घोरते निवांत कर्क राशि ॥
आपलेच अंथरुण पांघरुण आपलीच तीच ऊशी,
सावधान पोज घेऊनच निद्रा घेते सिंह राशि ॥
दारे खिडक्या बंद करुन पुन्हा पुन्हा तपाशी,
अर्धे नेत्र उघडे ठेऊन, झोपते कन्या राशि ॥
दमला भागला जीव म्हणे कधी एकदा आडवा होशी,
ब्रह्मानंदी टाळी लागून, झोपी जाते तूळ राशि ॥
एक मच्छर भुणभूण कानी कपाळावर बसली माशी,
माझ्या नशीबी झोप नाही, म्हणते नेहमी वृश्‍चिक राशि ॥
रात्रि जागरण विनाकारण ऑफिसात डुलकी खुशाल घेशी,
रित अशी ही उडाणटप्पू झोपली बघा धनू राशि ॥
सगळं कसं वेळेवर जांभई दहाच्या ठोक्याशी,
गजर नाही भोंगा नाही उठते वेळेत मकर राशि ॥
शिस्तीत आपण रहायचं तक्रार नाही कशाची,
जिथे जसे जमेल तशी, निद्रीस्त होई कुंभ राशि ॥
हातपाय धुवून येऊन प्रार्थना करून देवापाशी,
दिनकर्माचा आढावा घेते सात्विकतेने मीन राशि ॥
(फेसबुक पोस्ट)


आई : उठ बेटा तुझी शाळेची वेळ झालीय…
रमेश (झोपेतच) : माझे मन नाहीये शाळेत जायचे…
आई : मला तू अशी दोन तरी कारणे सांग की ज्यामुळे तुला शाळेत जायचे मन नाही होत आहे…
रमेश : एक तर कोणाही मुलांना मी आवडत नाही आणि दुसरं कुठल्याही मास्तरांना मी आवडत नाही…
आई : ही काही कारणं नाही झाली शाळेला बुट्टी मारायला, चल उठ! शाळेत तर जावेच लागेल तुला…
रमेश : बरं आई तू मला कोणतीही दोन कारणे सांग की मी शाळेत का जायला हवं ?…
आई : एक तर तू 45 वर्षांचा झाला आहेस. तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव असायला हवी…
आणि… दुसरं तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा