पुणे : पालखी सोहळ्यामुळे शहर आणि परिसरात भक्तीमय वातावरण आहे. सदाशिव पेठेतील मूर्ती शिल्पकार विनोद येलापूरकर हे विठ्ठलाची 25 फुटी मूर्ती साकारत आहेत. फायबरच्या माध्यमातून मूर्ती साकारली जात आहे. या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दत्तात्रय भालेगरे व कमलेश भालेगरे हे मूर्ती साकारून घेत आहेत. या 25 फुटी मूर्तीचे काम सिंहगड रस्ता परिसरातील स्टुडिओमध्ये सुरू आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही मूर्ती वाईजवळील कुठाळ या गावामध्ये बसविण्यात येणार आहे. फायबरमध्ये 25 फुटी मूर्ती साकारण्याचे काम विनोद येलापूरकर व त्यांचे सहकारी मागील दोन महिन्यांपासून मूर्ती साकारण्याचे काम करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा