नवी दिल्ली : कोरोना आणि फुफ्फुस संसर्गाने आजारी आहे. त्यामुळे प्रकृती बरी झाल्यानंतर आणखी काही दिवसांनी मी सक्त वसुली संचालनालयात (ईडी) चौकशीसाठी हजर राहणार आहे, असे पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीला लिहिले आहे.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्रातील गैरव्यवहार व मनी लाँड्रींग प्रकरणातील आरोपामुळे सोनिया गांधी यांना 23 जून रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास ईडीने सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी हे पत्र ईडीला लिहिले आहे.
कोरोना आणि फुफ्फुसातील संसर्गामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांना रुग्णालयातून सोडले आहे. प्रकृती चांगली होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. प्रकृती बरी झाल्यावर मी चौकशीला हजर राहणार आहे, असे गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे, असे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोनिया गांधी यांना रुग्णालयातून सोमवारी घरी सोडले होते.